सावंतवाडीच्या नगराध्यक्षा बनल्या 'आई' !

इतिहासात होणार अशीही नोंद !
Edited by: विनायक गांवस
Published on: February 03, 2026 23:45 PM
views 693  views

सावंतवाडी : सावंतवाडी संस्थानला ४०० वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. याच घराण्याच्या १९ व्या पिढीतील सुनबाई युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले नुकत्याच थेट जनतेतून निवडून येत सावंतवाडीच्या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या. पोटात मुलं असताना त्यांनी ही निवडणूक लढवली अन् जिंकली होती. आज त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले असून सावंतवाडीच्या इतिहासात पहिल्यांदाच नगराध्यक्षपदावर कार्यरत असताना मातृत्व प्राप्तीची हा पहिलाच प्रसंग असल्यानं इतिहास या क्षणाची सुवर्णाक्षरांनी नोंद होणार आहे.

सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी तथा नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले आणि युवराज लखमराजे भोसले यांना पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. या शुभघटनेमुळे राजघराण्याच्या २० व्या पिढीचा उदय झाला. नुकतीच युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी गरोदर असताना देखील सावंतवाडी नगरपरिषदेची निवडणूक लढवली होती. पोटात मुलं असताना देखील त्यांनी शहर पिंजून काढल होत. राजघराण्याचा सुरू झालेल्या या राजयोगात आज मातृत्व प्राप्त झाल्यान आणखीन भर पडली आहे. पुत्ररत्नाच्या रूपानं ४०० वर्षांच्या गौरवशाली परंपरेला‌ वारस मिळाला‌ आहे. 


दुसरीकडे सावंतवाडीच्या नगराध्यक्ष पदावर कार्यरत अताना मातृत्व प्राप्त होण्याची ही पहिलीच व ऐतिहासिक घटना आहे. यामुळे सावंतवाडीच्या इतिहासात वेगळी नोंद होणार आहे. युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले या १८ व्या नगराध्यक्ष असून चौथ्या महिला नगराध्यक्षा आहेत. यापुर्वी अनारोजीन लोबो, श्वेता शिरोडकर, पल्लवी केसरकर यांनी नगराध्यक्षपद भुषवल‌ होत. चुल अन् मुलं सांभाळत असताना सावंतवाडीचा कारभार देखील हाकला होता. युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या रूपानं ही परिस्थिती प्रत्यक्ष अनुभवायला येणार आहे. नगराध्यक्षपदी कार्यरत असताना आई होण्याची ही पहिलीच घटना आहे.‌ त्यामुळे सावंतवाडीच्या गौरवशाली इतिहासात अशीही एक वेगळी नोंद होणार आहे.