
सिंधुदुर्गनगरी : ओरोस खालची परबवाडी येथील श्री देव महापुरुष ब्राम्हणदेव मंदीराचा वार्षिक उत्सव रविवार दिनांक ८ फेब्रुवारी रोजी होत असून त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम व दशावतार नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आलेला आहे.
रविवार दिनांक ८ रोजी सकाळी ७ वा. गणेश पुजन व अभिषेक, ८ वा. श्री सत्यनारायणाची महापुजा, दुपारी १ ते ३ पर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ५ वा. हळदीकुंकू समारंभ, ६ ते ८ वा. स्थानिक भजने, आणि रात्रो ९ वा. नितीन आसयेकर प्रस्तूत मळगाव-सावंतवाडी येथील श्री देवी भूमिका दशावतार लोककला नाट्यमंडळाचा संत सद्गुरु देवावतारी 'बाळूमामा' (भाग २, पुर्वार्ध) हा रसिकांच्या पसंतीचा नाट्यप्रयोग मिनीट्रिकसीनसह होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव महापुरुष कला व क्रीडा मित्रमंडळाने केले आहे.










