अखेर सावंतवाडीतील 'ती' बेपत्ता महिला सापडली

सामाजिक बांधिलकी टीमच्या प्रयत्नांना यश
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 02, 2022 11:03 AM
views 651  views

सावंतवाडी : काल गुरुवारी दुपारपासून बेपत्ता असलेल्या मिलाग्रीन फर्नांडिस या महिलेने पूर्ण रात्र नरेंद्र डोंगराच्या जंगलामध्ये काढली.

आज शुक्रवारी सकाळी पहाटे उतरून ती आकेरी पुलाच्या दिशेने रवाना झाली. आकेरी हुमरस (खान मोहल्ला) कुडाळच्या दिशेने जाताना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास सामाजिक बांधिलकी आपत्कालीन टीमला सदर महिला सापडली. तिला परिवारामध्ये सुपूर्द केले तेव्हा तिच्या परिवारात  आनंदाचे वातावरण पसरले. तर नातेवाईकांचे अश्रू अनावर झाले होते.

सदर महिलेला शोधण्यासाठी  रवी  जाधव व रूपा मुद्राळे यांनी खूप मेहनत घेतली. रात्री दोन वाजेपर्यंत शोध कार्य सुरू होतं. पुन्हा सकाळी सहा वाजल्यापासून शोध मोहीम सुरू केले होती.

 रवी जाधव, रुपा मुद्राळे, संजय पेडणेकर, दीपक सावंत ,शुभम सावंत, समीरा खलील, आमीन खलील,अरुण घाडी, संकेत माळी

सामाजिक बांधिलकी या आपत्कालीन टीमचे आभार मानले असून सावंतवाडी परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.