
कणकवली : उपकार्यकारी अभियंता उपविभाग कणकवली यांच्या कार्यालयात ऊर्जा मित्र बैठक नुकतीच पार पडली. बैठकीत कनिष्ठ अभियंता मनीष सावंत यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
ग्राहकांच्या समस्या निवारण करण्याची कार्यपद्धती, बिलांबाबत चौकशी, मीटर चे पैसे, बिलातील स्थिर आकार, मीटर तोडणे, कलमठ बिड्येवाडी येथील तिरका झालेला विद्युत पोल, पोलचे भाडे मिळण्याबाबत व इतर काही शासन निर्णय, बंद घरांच्या परिसरात मालकाच्या परवानगी शिवाय पोल टाकणे, सोलर बसविणे, वीज वितरण कंपनीच्या विविध योजनांना जनतेच्या सोयीसाठी प्रसिद्धी देणे, उच्चदाबाची लाइन बदलणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
सदर बैठकीला ग्राहक पंचायत महाराष्ट्र सिंधुदुर्ग उपाध्यक्ष सुगंधा देवरुखकर, जिल्हा महिला संघटक रीमा भोसले, तालुका अध्यक्ष श्रद्धा कदम, संघटक सुभाष राणे, कोषाध्यक्ष राजन भोसले, सचिव पूजा सावंत, सदस्य नितीन बांदेकर आदी उपस्थित होते.











