
सावंतवाडी : अखेर अनावश्यक ठिकाणी उभारण्यात आलेला दिशादर्शक फलक माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांच्या निवेदनाची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हटवला. यासाठी सावंतवाडी शहराच्या हायवे रस्त्यावर पणजी मुंबई कोल्हापूर सावंतवाडी बेळगाव अशा जोड रस्त्यावर लावण्यासाठी सार्वजनिक बांधकामचे ठेकेदार नेमून त्यावर शासनाचा लाखो रुपये खर्च केला जात असतो. मात्र चुकीच्या धोरणामुळे वैश्य वाडा या ठिकाणी लावण्यात आलेला दिशादर्शक फलक हटवण्याची मागणी, या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश भोगटे, नाना गोंधळकर, सतीश नार्वेकर, सत्यजित धारणकर व इतर मंडळींनी करत जनतेच्या पैशाचा दुरुपयोग करून अनावश्यक ठिकाणी हजारो रुपये खर्च करून सुरू असलेला शासनाचा गलथान कारभार उघडकीस आणला होता. त्याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ फलक हटवण्याची कार्यवाही केली.