
सावंतवाडी : महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री कै.भाईसाहेब सावंत यांचे सुपुत्र, शि.प्र.मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विकास सावंत यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झालं. ते ६२ वर्षांचे होते. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी माजगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
तत्पूर्वी सकाळी राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या सभागृहात विकास सावंत यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहत पुष्पांजली अर्पण केली. माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, आयुर्वेद महाविद्यालयाचे अध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कॉग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहत अंत्यदर्शन घेत आदरांजली वाहिली.
विकास सावंत यांनी आपल्या सर्व शैक्षणिक संस्थांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. शाळा हाच त्यांचा ध्यास होता. विकास सावंत यांच्या निधनाने 'एका समर्पित जीवनाचा' अंत झाल्याची भावना माजी शालेय शिक्षण मंत्री आ. दीपक केसरकर यांनी व्यक्त केली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शोक व्यक्त करत सावंत परिवाराच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत अशा भावना व्यक्त केल्या. राणी पार्वती देवी हायस्कूल येथून यानंतर त्यांचे पार्थिव माजगाव येथील निवासस्थानी नेण्यात आले. येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. शेकडोंच्या जनसमुदायाने साश्रू नयनांनी विकास सावंत यांना अखेरचा निरोप दिला. त्यांचे सुपुत्र विक्रांत सावंत यांचे उपस्थितांनी सांत्वन करत धीर दिला.
यावेळी व्ही.बी.नाईक, सी एल नाईक, डॉ. दिनेश नागवेकर, अशोक दळवी, ॲड. सुभाष पणदूरकर, अन्नपूर्णा कोरगावकर, अण्णा केसरकर, ॲड. शामराव सावंत, रामदास निलख निता राणे, समीर सावंत, महेंद्र सांगेलकर, बाबु कुडतरकर, प्रेमानंद देसाई, रमेश पै, अमोल सावंत, आनंद परूळेकर, सतीश बागवे, राजू मसूरकर, सुनिल राऊळ, रवींद्र मडगावकर, अमरसेन सावंत, साक्षी वंजारी, समीर वंजारी, किरण टेंबुलकर, सतीश घोटगे, एल.पी. पाटील, बी.व्ही. मालवणकर, सिताराम गावडे, संतोष सावंत, काका मांजरेकर, के.टी.परब, मनोज नाईक, सोनाली सावंत, आनंद नेवगी, संजू शिरोडकर, तुषार वेंगुर्लेकर, नारायण सावंत, मेघश्याम काजरेकर, अभय पंडीत, बाळासाहेब पाटील, वसुधा मुळीक, हर्षवर्धन धारणकर, बाळासाहेब नंदीहळ्ळी, राजन म्हापसेकर, शैलेश पै, रविकिरण तोरसकर, अजय गोंदावळे, ॲड. नकुल पार्सेकर, भाई देऊलकर, हेमंत बांदेकर, गजानन गावडे, संपत देसाई, डॉ. जयेंद्र परुळेकर, शब्बीर मणियार, ॲड. संदीप निंबाळकर, ॲड. परिमल नाईक, ॲड. पी.डी. देसाई, सत्यजित धारणकर, शैलेश गौंडळकर, निशांत तोरसकर, आशिष सुभेदार, समीरा खलिल, तौकीर शेख, प्रा.लवटे, बाळा गावडे, आबा सावंत, भरत गावडे, संदिप कुडतरकर, चंद्रकांत कासार, शैलेश नाईक, कौस्तुभ पेडणेकर, बंटी पुरोहित, माया चिटणीस, संप्रवी कशाळीकर, ॲड. राघवेंद्र नार्वेकर, अरुण भिसे, सुनील पेडणेकर, शिवाजी सावंत, संदीप राणे, जगदीश धोंड, रवी जाधव, अभिजित सावंत, रामा वाडकर, अभय शिरसाट, सुधीर आडिवरेकर, अनामारी डिसोझा, जावेद खतिब, जेम्स बोर्जीस, मार्टीन आल्मेडा, संजय लाड, एस.पी. नाईक, प्रल्हाद सावंत, अनिल भिसे, सुमेधा नाईक, अजय सावंत, डॉ अर्चना सावंत, महादेव पांगम, म.ल. देसाई, सुधीर पराडकर, बबन राणे, रवी सावंत,रेवती राणे,संदीप गवस, संतोष गांवस, संजय कानसे, सागर नाणोसकर,शामराव माने, अवधूत मालवणकर, केदार म्हसकर, नामदेव मुठे, अभिषेक कशाळीकर, रवी जाधव आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थ यांनी विकास सावंत यांना आदरांजली अर्पण केली.