वैभववाडी रेल्वे स्थानक परिसरातील खड्डे बुजवा

ठाकरे शिवसेनेची मागणी | कोकणसाद लाईव्हने मांडली होती व्यथा
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 01, 2023 12:31 PM
views 267  views

वैभववाडी : वैभववाडी रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.हे खड्डे गणेश चतुर्थी पुर्वी बुजविण्यात यावेत अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.याबाबतच निवेदन स्थानक व्यवस्थापकांकडे दिले आहे.रेल्वे स्थानकातील अपु-या सुविधाबाबत दै.कोकणसादने बातमी प्रसिद्धी केली होती.यानंतर आता शिवसेनेने याबाबत आवाज उठविला आहे.

रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली.स्थानकासमोरील परीसर पुर्णतः खड्डेमय झाला आहे.प्रवेशद्वारावरच खड्डे पडले आहेत.त्यामुळे वाहन चालक व प्रवासी यांना यांची अडचण होत आहे.रेल्वेप्रशासनाकडून वैभववाडी स्थानकाकडे  दुर्लक्ष केला जातोय असा आरोपही केला आहे.स्थानकातील प्रलंबित कामे होणे व जलद गाड्यांना थांबा मिळणं गरजेचं आहे.मात्र जाणूनबुजून या स्थानकाला मुलभूत सुविधांपासून डावले जात आहे.येत्या १०दिवसांत स्थानकासमोरील खड्डे न बुजविल्यास त्या खड्ड्यात वृक्षारोपण करण्यात येईल असा इशारा तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी दिला आहे.