
सावंतवाडी : शहरात बोगस पद्धतीने केलेले रस्ते दुरूस्त करताना शहरवासीयांना मनस्ताप देण्याच काम ठेकेदार, प्रशासनानं केल आहे. वारंवार तक्रार करुनही दुर्लक्ष केल्याने अखेर संतप्त झालेल्या नागरिकांसह जखमींच्या नातेवाईकांनी पोलीस ठाणं गाठलं. मनुष्यहानीस कारणीभूत ठरल्या प्रकरणी प्रशासक असणारे प्रांत, मुख्याधिकारी यांसह ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यासाठीची मागणी त्यांनी पोलिस निरीक्षकांकडे केली.
शहरात काही महिन्यांपूर्वी नव्यानं केलेलं रस्ते बोगस कामामुळे खराब झाले. या विरोधात जनक्षोभ उसळल्यानंतर ठेकेदारान पुन्हा दुरूस्ती केली. यावेळी चुकीच्या पद्धतीने काम करत डांबरापेक्षा ग्रीट अधिक मारली गेली. यामुळे हवा प्रदूषणासह अपघातांना आमंत्रण मिळत आहे. दोन दिवसांत तब्बल नऊ अपघात आजमितीस घडले आहेत. यात गंभीर दुखापतींना सामोरं जावं लागलं. यातील दोन जणांवर उप जिल्हा रुग्णालय उपचार सुरू आहेत. याबाबत प्रशासनाच लक्ष वेधून ही दुर्लक्ष केलं गेलं. यामुळे आक्रमक झालेल्या शहरवासीयांनी अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांसह पोलीस ठाणे गाठ ल. मनुष्य हानीला कारणीभूत ठेकेदारासह प्रशासकांवर मनुष्य हानीचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली.
यावेळी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी संतप्त भावना लक्षात घेत उद्याचा एक दिवस आपणास द्यावा, प्रशासनाला आपण याबाबत कल्पना देऊन शहरातील रस्त्यावरील अपघाताला कारणीभूत ठरणारी खडी बाजूला करण्यास सांगतो. तसेच नव्यानं गतिरोधक बसवलेत त्या ठिकाणी निर्देशन व पट्टे मारण्यासाठीच्या आपल्या भावना पोहचवतो असे आश्वासन दिले. यावेळी अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनी उद्यापर्यंत रस्ते सुस्थितीत न आणल्यास, खडी बाजूला न केल्यास गुरूवारी आपली तक्रार दाखल करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावे असे सांगितले. याप्रसंगी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, अपघातग्रस्त तथा उद्योजक सिद्धांत परब, प्रथमेश प्रभू, संदीप निवळे आदी उपस्थित होते.