बागेश्वर बाबावर गुन्हा दाखल करा : एम. के. गावडे

श्री संत साई बाबांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याचे सिंधुदुर्गातही उमटले पडसाद
Edited by: दिपेश परब
Published on: April 04, 2023 12:41 PM
views 383  views

वेंगुर्ला: 

आता खऱ्याअर्थाने कालियुग सुरू झाला आहे तसे वाटायला लागले आहे. कालपरवा जन्माला आलेल्या बागेश्वर नावाच्या कोणीतरी बाबाने करोडो लोकांचे श्रद्धस्थान असलेल्या श्री सद्गुरू साई बाबांवर चुकीच वक्तव्य करणे ही भाविकांच्या श्रेद्धेची थट्टा करणारे वक्तव्य असून यातून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि याचा आम्ही जाहीर निषेध करतो अशा लोकांवर तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहीजे.अशी मागणी  राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एम. के. गावडे यांनी केली आहे. 

     गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यांमुळेसातत्याने चर्चेत असणाऱ्या बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांनी आता महाराष्ट्रासह देशभरातील अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबां विषयी वादग्रस्त टिप्पणी केली आहे. "साईबाबा हे संत असू शकतात, फकीर असू शकतात पण देव नाही," असे उद्गार धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी काढले होते. शास्त्रींच्या या वक्तव्यामुळे साई भक्तांमधून संतापाची लाट उसळली असुन ठिकठिकाणी त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला जात आहे. यापूर्वीही बागेश्वर बाबा यांनी वादग्रस्त आणि चिथावणीखोर वक्तव्यं केल्याचे प्रकार घडले आहेत. 

   संपूर्ण जगात श्री साई बाबांचे भक्त पसरले आहेत. देश विदेशातील सामान्य गरीब माणसापासू ते उद्योजक, कलाकार, राजकारणी, सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्ती, अगदी राष्ट्रपती सुद्धा शिर्डी येथे श्री साई बाबांच्या स्थळाला भेट देतात नतमस्तक होतात. आणि त्यांच्यावर असे खरकटे वक्तव्य केले जाते याचे दुःख वाटते. आणि तथाकथित पंडितांचार्य यावर काहीच बोलत नाहीत. याचे आश्चर्य वाटते. रामरहीम, आसाराम, कालीचरण, बागेश्वर यांचा जमाना आला आहे. ते काहीही बोलतात आणि लोक मात्र ऐकून घेतात. एका हिंदी चित्रपटात ऐसा कालियुक आयेगा असे गाणे होते. आज रोजी ते तंतोतंत खरे होताना दिसत आहे. श्री संत साई बाबा हे साक्षात परमेश्वराचे रूप असून ते आमच्या श्रेद्धेचे, निष्ठेचे परमोच्च स्थान आहे. आणि त्यांच्या बिरोधात बोलणाऱ्या असल्या बागेश्वर सारख्या खोटारड्या बाबाची लायकी नाही. प्रत्येकाने याचा निषेध केला पाहिजे. असेही यावेळी एम के गावडे म्हणाले.