
सावंतवाडी : सावंतवाडीतील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या इयत्ता चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी 'एस.एस.जी. एस. थिंक टँक' अंतर्गत कोकणचं नं. १ महाचॅनेल कोकणसाद LIVE व दै.कोकणसादच्या सावंतवाडीतील प्रधान कार्यालयास भेट दिली. प्रिंट मिडिया आणि डिजीटल मिडीयाच काम कसं चालतं याची त्यांनी प्रात्यक्षिकासह माहिती घेतली. यावेळी मिडीबद्दल कुतुहल असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह त्यांच्या शंकाच निरसन टीम कोकणसादनं केलं.
स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या इयत्ता ४ थी व ५ वी च्या विद्यार्थ्यांनी कोकणसादच्या कार्यालयात फिल्ड व्हिझीट करत मिडिया क्षेत्रात काम कसं चालतं याचा अनुभव घेतला. डिजीटल मिडीयाच्या कामासह न्युज रूम, लाईव्ह वार्तांकन, वेब पोर्टलसह बातमीवर होणाऱ्या संस्कारासह ती लोकांपर्यंत कशी व कोणकोणत्या माध्यमातून पोहचते. यासह स्टुडिओ, अँकर, व्हाईस ओव्हरबरोबर संपादकीय विभागाच्या कामाची माहिती सबइडिटर जुईली पांगम व भगवान शेलटे यांनी विद्यार्थ्यांना दिली. व्हिडिओ एडिटर प्रसाद कदम व मयुरेश राऊळ यांनी व्हिडिओ एडिटिंगसह फोटोग्राफी, व्हिडिओग्राफीबद्दलची माहिती दिली. पीसीआर सेक्शनच काम कसं चालतं याची माहिती विद्देश धुरी, अनिकेत नार्वेकर यांनी तर सोशल मिडिया कोऑर्डीनेटर नेहा मुळीक हीन लोकांपर्यंत बातमी कशी पोहचवली जाते याची माहिती दिली. दैनिक कोकणसादच्या दैनंदिन कामासह व पेपरच्या प्रिंटिंगबद्दल उपसंपादक लक्ष्मण आढाव यांनी मुलांना मार्गदर्शन केलं.
दरम्यान, डिजिटल मिडिया व प्रिंट मिडिया, न्युज चॅनल व न्यूज पेपर, लाईव्ह वार्तांकनासह न्युज पब्लिशिंगची प्रक्रिया कोकणसाद LIVE च्या संपादक देवयानी वरसकर यांनी विशद करत मुलांना मार्गदर्शन केलं. मिडिया क्षेत्रातील संधीची माहिती देत या क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यासाठीच आवाहन केलं. यावेळी विद्यार्थ्यांकडून देखील मिडिया क्षेत्रात काम करायला आवडेल अशी इच्छा व्यक्त करण्यात आली. यावेळी बदलत्या पत्रकारितेच स्वरूप, आर्टीफिशिअल इंटेलिजंसचा होत असलेला वापर याबाबत कुतुहल असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या समस्यांचे निराकरण टीम कोकणसादकडून करून घेतलं.
स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे संचालक अँड.रुजुल पाटणकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. मुलांना व्यक्त होता याव मिडिया क्षेत्रातील संधी त्यांना अवगत व्हाव्यात या हेतूनं हा उपक्रम राबविण्यात आला होता. दोन बॅचमध्ये विद्यार्थ्यांनी या फिल्ड व्हिझीटमध्ये सहभाग घेतला. मिडियातील प्रत्यक्ष अनुभवानंतर चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. स्टेपिंग स्टोनच्या कोऑर्डीनेटर सुषमा पालव, शिक्षिका ग्रीष्मा सावंत, आश्विनी पडवळ, प्राची साळगावकर, झरीन शेख यांनी मुलांसोबत मिडिया क्षेत्रातील कामाची माहिती घेतली. तर 'फ्रेंडशिप डे'च औचित्य साधून या छोट्या दोस्तांनी 24×7 काम करणाऱ्या मिडीयातील मित्रांना मैत्रीचा धागा बांधला.
याप्रसंगी कोकणसाद LIVE चा संपादक देवयानी वरसकर, दै.कोकणसादचे संपादक संदीप देसाई, उपसंपादक रविंद्र जाधव, लक्ष्मण आडाव, सब एडिटर जुईली पांगम, भगवान शेलटे, व्हिडीओ एडिटर प्रसाद कदम, मयुरेश राऊळ, आयटी हेड विद्येश धुरी, सावंतवाडी करस्पोडंट विनायक गांवस, अकाउंट हेड ओंकार नाईक, पीसीआर एक्झीक्युटिव्ह अनिकेत नार्वेकर, सोशल मिडीया कोओर्डीनेटर नेहा मुळीक, ऑफिस असिस्टंट संतोष गुडूलेकर आदी उपस्थित होते. फिल्ड व्हिझीट दरम्यान दिलेल्या माहितीबद्दल व व्यस्त शेड्युलमधून खास वेळ दिल्याबद्दल विद्यार्थ्यांनी टीम कोकणसादचे आभार मानले.