
दोडामार्ग : आयनोडे पुनर्वसन गावात श्री देव भूतनाथ सातेरी पंचायतन देवस्थान समिती व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक, क्रीडा व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला.
शैक्षणिक क्षेत्रात स्कॉलरशिप परीक्षेत यश मिळविणाऱ्या प्रतीक प्रदीप देसाई (इ.५ वी) व अथर्व अरुण सावंत (इ.८ वी) यांचा सत्कार करण्यात आला. तसेच माध्यमिक शालांत परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या आदिती उल्हास सावंत, वैष्णवी वसंत न्हावी, श्रेया सुधीर सुतार, वैष्णवी विजय नाईक, मैथिली संदीप सावंत आणि प्रांजल निलेश सावंत (अबॅकस स्पर्धा – प्रथम क्रमांक, सुवर्णपदक) यांचाही गौरव करण्यात आला.
उच्च शिक्षणात यश मिळविणाऱ्या भक्ती सदाशिव आयनोडकर (बीएससी नर्सिंग) व अनिल राजेंद्र सावंत (बी.ई. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग) यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे आयोजित ‘नवं पराक्रम स्पर्धा २०२५-२६’ मध्ये पूर्व प्राथमिक गटातून राज्यात पाचवा क्रमांक मिळविणाऱ्या अर्पिता अरुण सावंत (अंगणवाडी सेविका, झरे-२) यांचाही सन्मान करण्यात आला.
क्रीडा व अन्य क्षेत्रातील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये प्रतीक प्रदीप देसाई (बुद्धिबळ – जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक), अर्णव संजय सावंत (स्केटिंग – आंतरराष्ट्रीय स्तरावर २०० पदके प्रमाणपत्रे), श्रेयस संदीप सावंत (कबड्डी – विभागीय संघ, माध्यमिक स्तर), प्रथमेश यशवंत सावंत (कबड्डी – विभागीय संघ, उच्च माध्यमिक स्तर), प्रिया प्रदीप देसाई (राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा – बाल चित्रकार पुरस्कार) आणि गुंजन निलेश सावंत (युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रॅम – राज्यस्तरीय प्रथम क्रमांक) यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास विश्वस्त विलास सावंत, हर्षद सावंत, विष्णू सावंत, देवस्थान कमिटी अध्यक्ष डॉ. नितीन सावंत, उपाध्यक्ष प्रदीप देसाई, सचिव अरुण सावंत, खजिनदार मालोजी सावंत, सदस्य निलेश सावंत, श्रीनिवास सावंत, सदाशिव आयनोडकर, नकुळ चोर्लेकर, उदय सावंत, उल्हास सावंत, कृष्णा ठाकूर, रामचंद्र सावंत, नारायण सुतार, डेमा आयनोडकर तसेच शिक्षण विभागातील सेवानिवृत्त विस्तार अधिकारी लक्ष्मण सावंत, प्रमोद देसाई, आनंद ठाकूर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप देसाई यांनी केले.













