बाप-बेट्यांचा' मी सिनीअर : नारायण राणे

राज्यात, देशात महायुतीचीच सत्ता येणार विनायक राऊतांमुळे कोकणातील प्रकल्प रखडले
Edited by: विनायक गांवस
Published on: May 05, 2024 13:14 PM
views 115  views

सावंतवाडी : नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवताना चारशे पार करत असताना  रत्नागिरी-सिंधुदुर्गचा खासदार त्यात असावा यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा असं आवाहन महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं. सावंतवाडी येथील जाहीर सभेत ते बोलत होते. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. विरोधी पक्षाचे बहुतेक नेतेमंडळी इथे येऊन गेले. पण, त्यांनी काय विकास केला ? हे सांगितल नाही. कोणते उद्योगधंदे, पायाभूत सुविधा, हाताला काम त्यांनी दिलं का ? उद्धव ठाकरेंचा उमेदवार इथे लढतोय. पण, दहा वर्षांत त्यांनी काय केल हे सांगू शकले नाही. दहा वर्षांत काहीही केलं नाही. केवळ शिव्या द्यायला, अपशब्द बोलायला ही मंडळी इकडे येतात. आडवा आला तर गाढून टाकीन हा गुन्हा नाही का ? तो चिमुरडा काय बोलतो. त्यानं वडीलांना विचाराव ते कुठे नोकरी करतात. गाडी, बंगला घेतात हे सांगाव असं आव्हान दिल.

तर दिशा सालीयन प्रकारणात कोण होता ? सुशांतसिंग मृत्यू प्रकरणात कुणाचा हात होता ? माझ्याकडे मातोश्रीच सगळं आहे. रमेश मोरे, जाधवची हत्या का झाली, कुणी केली ? आमच सरकार येईल तेव्हा काढू बाहेर असा इशारा दिला. मातोश्री टु, गाडी, बंगले ठाकरेंकडे नोकरी नसताना आले कुठून ? मातोश्रीवर येणाऱ्या पेट्या जातात कुठे असा सवाल नारायण राणेंनी केला. त्यामुळे माशी मारायची हिंमत नसणाऱ्यांनी गाढायची भाषा करू नये. उद्धव ठाकरे हे कर्तृत्व शून्य माणूस आहे असा हल्लाबोल राणेंनी केला. 

२०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाच्या अर्थव्यवस्थेत ११ नंबरवर असणारा भारत पाचव्या  क्रमांकावर आणला. ते कसं झालं हे उद्धव ठाकरेंना कळणार नाही. २०३० पर्यंत आत्मनिर्भर भारत बनवायचं स्वप्न मोदींच आहे. कोरोनात उद्धव ठाकरेंसारखे मोदी घरात बसले नाहीत. हे महाशय अडीच वर्षांत दोन वेळा मंत्रालयात गेले. महाराष्ट्रात कोरोनात आलेल्या औषधात टेंडर काढून १५ टक्क्यांची मागणी केली. नरेंद्र मोदींनी लस तयार केली. उद्धव- आदित्यनी पैसे मोजले. खोके म्हणून आमदारांना म्हणतात. याच आमदारांनी दिलेल्या खोक्यावर उद्धव ठाकरेंनी दुसरा बंगला बांधला. इथल्या खासदारान दहा वर्षांत काय केल ? चौपदरीकरण, विमानतळ आपण केलं असं ते सांगतात. दुसऱ्याच्या मुलाला आपलं अपत्य म्हणायचा हा प्रकार आहे. मी मंत्री असताना चिपी विमानतळ आणलं. तेव्हा खासदार विनायक राऊत पंधरा जणांना घेऊन विरोध करत होते. विमानतळ मी पूर्ण केलं. पण, आयत्या बिळावर नागोबा म्हणून मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे तेव्हा उद्घाटनाला आहे. तेव्हा उद्धव ठाकरेंना तोंडावर सांगितल हा खासदार विनायक राऊत प्रत्येक कामात टक्केवारी घेतो, पैसा खातो‌. जैतापूर प्रकल्प, नाणार प्रकल्पाला विरोध या खासदारांनी केला. देशात नाणार सारखे दहा प्रकल्प सुरू आहेत. परंतु, केवळ थापा मारण्याच काम काही लोक करून लोकांची दिशाभूल करत आहेत. कोकणात जेवढी आंदोलन शिवसेनेन केली ती पैशासाठी केली. हायवेत पण आढवे येत होते. परंतु, आम्ही ते होऊ दिलं नाही. म्हणून, सिंधुदुर्गचा हायवे पूर्ण झाला. रत्नागिरीत अद्याप पूर्ण होत नाही आहे. अनेक कौशल्यपूर्ण काम करणारी मुलं रोजगाराला इथं लागली असती. खासदारान केलेल्या विरोधामुळे प्रकल्प होऊ शकले नाही. त्यामुळे इथ बेकारी आहे. परंतू,येणाऱ्या काळात ती नसेल. त्यासाठी नरेंद्र मोदींना साथ द्या असं आवाहन नारायण राणेंनी केल. दोडामार्ग तालुक्यात पाचशे कारखाने आपण आणत आहोत. फुड प्रोसेसिंगचे कारखाने तिथे येत आहे. आंबा, काजू, फणस याला जगात बाजारपेठ त्यातून निर्माण होईल. ओरोस येथे ट्रेनिंग सेंटर सुरू केलं आहे. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी का कोकणात प्रकल्प आणला नाही ? असा सवाल केला. उद्धव ठाकरेंच पिल्लू म्हणत ३७० कलम हटवण हे आमचं स्वप्न होतं. मोदी तडीपारची भाषा करत आहे. यांचे ५८ आणि आमचे ३०३ खासदार आहेत. आता आमचे ४०० खासदार होतील. त्यामुळे भाजपला तडीपार करण्याची स्वप्नं त्यांनी बघू नये असा टोला राणेंनी हाणला. 


उद्धव ठाकरे, शरद पवार, राहूल गांधींची सत्ता आयुष्यात येणार नाही. अतृप्त आत्मे म्हणून मोदींनी या लोकांचा उल्लेख केला. चार वेळा राज्यात मुख्यमंत्री, बारा वेळा दिल्लीत मंत्री असणारे शरद पवार आज शेतकऱ्यांसाठी अस्वस्थ होत आहेत. मग, पवारांनी इतक्या वर्षांत शेतकऱ्यांसाठी केलं काय ? लोकांना उल्लू बनवायचं काम इंडिया आघाडीचे लोक करत आहेत असा घणाघात नारायण राणेंनी केला. 

कोकणात अनेक विकासकामे मी केलीत. रस्ते, वीज, पाणी गावागावात पोहोचवल. विमानतळ पूर्णत्वास आणल‌ं. शासनाच्या माध्यमातून विकासकामं केलीच पण, खाजगी स्वरूपातही लोकांना उपयोगी पडणारे उपक्रम राबविले‌. वडीलांच्या नावानं मी ट्रस्ट सुरू केलं आहे. यातून गंभीर आजार असणारे रूग्ण, शिक्षणासाठी आर्थिक परिस्थिती नसणारे विद्यार्थी यांना मोफत मदत केली. मोदींनी ५४ योजना देशात राबविल्या. देशाच उत्पन्न वाढलं हे चांगल की वाईट ? हे ज्या ठाकरेंना कळत नाही त्यांच्यावर काय बोलणार‌‌ असा टोला हाणला. या बाप-बेट्याचा मी सिनीअर आहे. राज्यात आणि देशात आमची सत्ता येणार आहे. या सिंधुदुर्ग जिल्ह्यात माझा जन्म झाला. या जिल्ह्यान मला खूप काही दिलं. ९० ला बाळासाहेब ठाकरे यांनी मला इथं पाठवल. कणकवली मालवणच्या जनतेन मला आमदार केलं. मंत्री, मुख्यमंत्री, विरोधीपक्षनेता ते केंद्रीय मंत्री ही पद मला कोकणी जनतेमुळे मिळाली. लोकांच प्रेम मला मिळाल. कोकणच नाव मोठं करण्याचा प्रयत्न केला असं श्री. राणे म्हणाले. उद्धव ठाकरे हे ढोंगी, खोटारडे, विकृत आहे‌त. हे संविधानीक शब्द आहेत. युद्ध आणि निवडणूकीत विजयी झाल्याशिवाय नजर हटवू नका. नारायण राणे विजयी होतील तेव्हा विजयोत्सव साजरा करा असं आवाहन करत ४ जूनला पुन्हा भेटू असं मत नारायण राणेंनी व्यक्त केल.

 याप्रसंगी महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, आमदार निरंजन डावखरे, शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी आमदार राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब, राष्ट्रवादीचे काका कुडाळकर, भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख अँड. नीता कविटकर, मनसेचे अँड. अनिल केसरकर, राजन पोकळे, अँड. राजू कासकर, सचिन वालावलकर, बबन राणे, प्रेमानंद देसाई, नितीन मांजरेकर, रुपेश पावसकर, अशोक पवार, रमाकांत जाधव, अनारोजीन लोबो, गणेशप्रसाद गवस आदींसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.