कार - बाईकमध्ये भीषण अपघात ; युवक जागीच ठार

Edited by: विनायक गावस
Published on: May 23, 2023 19:21 PM
views 103  views

सावंतवाडी : कोलगाव आयटीआयसमोर कार व दुचाकी मध्ये भीषण अपघात झाला. यात एक युवक गंभीर जखमी होऊन गतप्राण झाला. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला.

चारचाकी व दुचाकीत भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील रोहित रामचंद्र कळसुलकर (वय २० रा. माणगाव नाणेली) हा ठार झाला. तर उत्तम उदय नेवगी ( वय 22 नानेली माणगाव) हा किरकोळ जखमी झाला आहे.

अपघातानंतर त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करीत आहेत.