भीषण अपघात ; दोघे जागीच ठार

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 09, 2023 11:08 AM
views 4378  views

देवगड : देवगड तालुक्यातील तोरसोळे फाटा येथे ट्रक व कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघे ठार झालेत. त्यात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली.

या बाबतची माहिती मिळताच नागरिकांनी धाव घेत बचाव कार्याला मदत केली. मात्र अपघाताचे नेमके कारण अद्यापही समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच देवगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष भालेराव, वाहतूक पोलीस फकरुद्दीन आगा, विशाल वैजल, निलेश पाटील, दीपेश तांबे, संतोष नाटेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.