वेंगुर्ले : तुळस येथे दर्जेदार तलाठी कार्यालय बांधुन पुर्ण झाले असून आज पासून लोकांच्या सेवेत दाखल झाले आहे. येथे येणारे शेतकरी आणी खातेदार यांना तलाठी, मंडळ अधिकारी यांचे मार्फत चांगल्याप्रकारे सेवा दिली जाईल अशी ग्वाही तहसीलदार ओंकार ओतारी यांनी दिली. तुळस येथील नविन तलाठी कार्यालयाचे उद्घाटन आणि लोकार्पण तहसिलदार श्री. ओतारी यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी सदर कार्यालयासाठी विनामोबदला साडे सात गुंठे जमीन दान करणारे मराठे कुटुंबीय यांचे तहसिलदार साहेब यांचे हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी तुळस गावाचे सरपंच सौ. रश्मी परब, उपसरपंच सचिन नाईक, माजी सभापती यशवंत उर्फ बाळू परब, संजय गांधी निराधार योजनेची वेंगुर्ला अध्यक्ष तथा पेंडूर सरपंच संतोष गावडे, तुळस सोसायटी चेअरमन श्री. संतोष शेटकर, ग्रामपंचायत सदस्य जयवंत तुळसकर, माजी सरपंच श्री. विजय रेडकर, तसेच सुजाता पडवळ, सौ. प्रेरणा गिरप मंडळ अधिकारी मातोंड, श्री. विनायक कोदे मंडळ अधिकारी वेंगुर्ला, श्री. निलेश मयेकर मंडळ अधिकारी शिरोडा, श्री. केशव धुमाळे तलाठी, श्री. प्रविण सरगर, कोतवाल, तुळस मधील तिन्ही महसुली गावाचे पोलीस पाटील आणि तुळस गावातील अनेक मान्यवर आणि शेतकरी खातेदार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. शंकर घारे, माजी सरपंच तुळस यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. आनंद गावडे, तलाठी यांनी केले.