छत्रपतींच्या ठेव्याला धोका पोहचवणारा शक्तीपीठ हवा कशाला ?

शेतकऱ्याचा सवाल
Edited by: विनायक गांवस
Published on: July 02, 2025 19:34 PM
views 122  views

शक्तीपीठ महामार्ग विरोधात सभा 

सावंतवाडी :  आम्हाला कोणतीही कल्पना न देता सर्व्हे केला गेला. आम्हा शेतकऱ्यांचा याला पूर्ण विरोध आहे. हनुमंत गडाच द्वार यात जाणार आहे. गडाचा काही भाग बाधित होत आहे. शिवछत्रपतींचा ऐतिहासिक ठेवा नष्ट होणार असेल तर शक्तीपीठ महामार्ग हवा कशाला ? असा सवाल शेतकरी शंभू आईर यांनी केला.


शक्तीपीठ महामार्गा विरोधात आयोजित सावंतवाडी येथील सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे, कॉ संपत देसाई, कॉग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,  माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा केसरकर, उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर, प्रसाद पावसकर, रूपेश राऊळ आदी उपस्थित होते.