
वैभववाडी : सिंधुवैभव ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्यावतीने उद्या (ता.७) बुधवार ०७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०.३० वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या सभागृहात शेतकरी मेळाव्याच आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शेतकऱ्यांना शेअर्स प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे.
या मेळाव्याची सुरवात दीपप्रज्वलनाने होणार आहे. त्यानंतर प्रास्ताविक, मार्गदर्शन, व दुपारी स्नेहभोजन, शेअर्स प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे नाबार्डच्या दिपाली माळी, जिल्हा कृषी अधिक्षक विजयकुमार राऊत, डॉ. मिलिंद जोशी, वैभव पाटील, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, पणन महामंडळ संचालक प्रमोद रावराणे, आत्मा समिती अध्यक्ष जयेंद्र रावराणे, गजानन पाटील यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी तालुक्यातील शेतकरी व कंपनी सदस्य यांनी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन कंपनीने केले आहे.