
सावंतवाडी : कोंडुरे येथील बागायतदार शेतकरी सद्या मोठ्या संकटात सापडला आहे. सगळीकडे माकडांचा उपद्रव वाढला असतानाच जंगली प्राणी मानवी वस्तीत उतरुन पाळीव प्राण्यांवर हल्ला करताना दिसत आहे.
शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने केलेली शेती ही गव्यांचा कळप नासधूस करत आहेत.जंगली प्राणी पाळीव प्राण्यांवर हल्ला करत आहेत.आता कोंडुरे तसेच आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या बागायती मधील नारळ शेकरु प्राणी अक्षरश : पोखरुन खात आहे.साहजिकच याचा फटका या बागायतदार शेतकऱ्यांना बसून आर्थिक नुकसान होत आहे.त्यात करुन उपद्रवी माकडांना त्रास सर्वत्र वाढतच चालला आहे.याबाबत मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायत सदस्य अर्जुन मुळीक कविता शेडगे व गावातील ग्रामस्थांनी याबाबत वनविभागाने लवकरात लवकर कारवाई करून शेतकऱ्यांचं होणारे आर्थिक नुकसान थांबवावे अशी मागणी केली आहे.