नेमळेतील शेतकऱ्यांचं पीक विमा भरपाईसाठी पालकमंत्र्यांना साकडं !

हवामानावर आधारित स्वयंचलित यंत्राची कायमस्वरुपी उभारणी नेमळेत करणार : पालकमंत्री
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 27, 2022 12:48 PM
views 241  views

सावंतवाडी : नेमळे गावातील विमाधारक शेतकऱ्यांना सन 20 21-22 च्या रब्बी हंगामात तापमान वाढीमुळे झालेल्या नुकसानाची विमा रक्कम ( आंबा काजू ) तातडीने मिळावी तसेच नेमळे गाव पूर्वीप्रमाणे सावंतवाडी महसूल मंडळात समाविष्ट करावे, या मागणीसाठी नेमळे गावातील विमाधारक शेतकऱ्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची केसरी येथील त्याच्या निवासस्थानी भेट घेऊन, आंबा , काजू हेच आम्हा  शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्नाचे एकमेव साधन असून विमा कंपनीकडून आम्हा  शेतकऱ्यांची जाणीवपूर्वक फसवणूक करण्यात आली आहे .२०२१/२२ ह्या रब्बी हंगामात प्रधानमंत्री फळपिकविमा (आंबा,काजू,) मध्ये सहभागी शेतकऱ्यांना पर्जन्यमानापासून झालेली नुकसानभरपाई देण्यात आली. मात्र, या हंगामात तापमान वाढीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात आली नाही. 2021 -22 च्या रब्बी हंगामात नेमळे गाव निरवडे मंडळात समाविष्ट करण्यात आला. निरवडे मंडळात हवामानाची नोंद घेणारी स्वयंचलित यंत्रणा बसवण्यात आली नाही. अशी यंत्रणा  न बसवल्याने शासन आणि विमा कंपनीने जाणीवपूर्वक आमची फसवणूक केली आहे. २०२१/२२पर्जन्यमानापासून झालेल्या नुकसानीची भरपाई  कोणत्या मंडळाच्या सांख्यिकीय माहितीच्या आधारावर देण्यात आली, त्याची माहिती मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच सन 2121 -22 मध्ये झालेल्या तापमान वाढीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने मिळावी अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे सन 2021 /22 पूर्वी नेमळे गाव सावंतवाडी मंडळाला जोडण्यात आले होते यंदाच्या रब्बी हंगामात नेमळे गाव पूर्वीप्रमाणे सावंतवाडी मंडळात जोडण्यात यावे अशी मागणी या शेतकऱ्यानी केली आहे.  नेमळे गाव आंबा पिकासाठी प्रसिद्ध आहे या गावात 70 ते 80 हजार आंबा कलमे आहेत पाऊस आणि तापमान वाढीमुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत  त्यामुळे याबाबत तातडीने पावले उचलण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी पालकमंत्री रविद्र चव्हाण यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी पालकमंत्री  रविंद्र चव्हाण यांनी दिवसेंदिवस  निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नसल्याने प्रत्येक शेतकऱ्यांने एकाच पिकावर अवलंबून न रहाता ऋतू मानानुसार जर आपल्या शेतात पिक घेतले तरच शेतकरी अशा परीस्थितीत तग धरु शकेल यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांने व्हर्टीकल पध्दतीने शेती करणे काळाची गरज आहे. नेमळे गावातील शेतकऱ्यांनी दिलेल्या फळपिक विमा नुकसानी मिळवून देण्यासाठी दिलेल्या निवेदना संदर्भात आपण प्रत्यक्ष जिल्हाधिकारी यांच्याशी भेट घेऊन विमा कंपनीकडून नुकसानी मिळवून  देण्यासाठी प्रयत्न करणार तसेच हवामानावर आधारित स्वयंचलित यंत्राची कायमस्वरुपी उभारणी नेमळे ग्रामपंचायत आवारात करणार असल्याचे आश्वासन नेमळे गावातील उपस्थित सर्व शेतकऱ्यांना दिले.  यावेळी नेमळे गावचे सरपंच विनोद राऊळ तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .