'त्या' शेतकऱ्यांचं आंदोलन स्थगित

अमित सामंतांची यशस्वी शिष्टाई
Edited by: देवयानी वरसकर
Published on: July 03, 2024 15:24 PM
views 145  views

सिंधुदुर्गनगरी : छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना व महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत २०१४ साली शासनाने कर्जमुक्ती योजना शेतकऱ्यांसाठी जाहीर केली. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शेतकरी मध्यम मुदत, अल्प मुदत. खावटी कर्ज घेतलेले आणि या योजनेत पात्र असलले अनेक कर्जदार शेतकरी, पीएम किसान सन्मान लाभार्थी,चालू वर्षी थ्रीप्स व कीड रोगांपासून आंबा काजूच्या बागांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर जाहीर केलेले अनुदान मिळावे. 

कोळे रोगामुळे २०२२ मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी. या सर्व योजनांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शेतकरी लाभापासून पासून वंचित आहेत,याबाबत शासनस्तरावर प्रयत्न करून सुद्धा न्याय मिळत नाही. म्हणून सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेने आज सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांचे याप्रकरणी लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. या उपोषण स्थळी सिंधुदुर्ग जिल्हा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत व अन्य पदाधिकारी यांनी उपोषण ग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन आपले जे प्रलंबित प्रश्न आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विधिमंडळ नेते तथा राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्याशी मी स्वतः आणि कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे परब तात्काळ संपर्क साधून चालू विधानसभा अधिवेशनात लक्षवेधी मांडून आपणांस न्याय मिळवून दिला जाईल. त्यामुळे आपण सुरू केलेले उपोषण स्थगित करावे,शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमी आपल्या सोबत आहे,अमित सामंत यांनी केलेल्या यशस्वी चर्चेअंती शेतकऱ्यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला, यावेळी कणकवली तालुका अध्यक्ष अनंत पिळणकर देवेंद्र पिळणकर यांचे सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.