तळेबाजार इथं शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 03, 2023 17:06 PM
views 146  views

देवगड : देवगड तळेबाजार इथं बुधवार दिनांक ४ ऑक्टोबरला सकाळी १०. ३० वाजता श्री. महालक्ष्मी मंगल कार्यालय तळेबाजार येथे शेतकरी मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या शेतकरी मेळाव्यामध्ये सेंद्रिय शेती, गट शेती, आंबा, काजू, नारळ, भात शेती, भाजीपाला या विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच सेंद्रिय उत्पादन मालाला मार्केट उपलब्ध करून देण्या विषयीचे मार्गदर्शन या मेळाव्यात करण्यात येणार आहे.

या मेळाव्यासाठी खास चिपळूण वरून मार्गदर्शक राज्यस्तरीय कोकण रत्न पुरस्कारप्राप्त कृष्णाजी गावकर, तसेच ढेपे देवगड तालुका कृषी अधिकारी, भोसले मंडळ कृषी अधिकारी, सदावर्ते कृषी सहाय्यक, यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

तरी मा. सरपंच, सर्व शेतकरी, आंबा बागायतदार, कृषी सखी, महिला बचत गट अध्यक्ष, सी आर पी, सर्व महिला बचत गट महिला यांनी उपस्थित राहावे.  असे आवाहन कृषी मेळावा आयोजकांच्या वतीने  करण्यात आले आहे.