
मोर्ले : हत्ती हल्ल्यातील शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर मोर्ले वासियांनी मोठा निर्णय घेतलाय. हत्ती पकड मोहीम राबविण्याचा निर्णय होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास ग्रामस्थांनी नकार दिलाय. जोपर्यंत हत्ती पकड मोहीम राबविण्याचे वनखाते, वनमंत्री, प्रशासन लेखी पत्र देत नाही तोपर्यंत मोर्लेत गेलेल्या वनकर्मचारी व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांना कोणालाच मोर्ले गाव सोडता येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आलाय.
मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णलयात पाठवा पण आपल्याला इथून हालता येणार नाही आणि मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही, अशीत अट ग्रामस्थांनी घातलीय. मोर्ले ग्रामस्थांनी वनक्षेत्रपाल वैशाली मंडल व पोलीस निरीक्षकांना हा निर्णय सांगितलाय.