दोडामार्गच्या पिंपळेश्वर गणपतीला भक्तीमय वातारणात निरोप..!

Edited by: संदीप देसाई
Published on: September 29, 2023 19:23 PM
views 131  views

दोडामार्ग : तब्बल अकरा दिवसांच्या सेवेनंतर दोडामार्गच्या पिंपळेश्वर सार्वजनिक गणपतीला शुक्रवरी रात्री उशिरा भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या अशी आळवणी करत.. तमाम शहरवासीयांनी आपल्या या लाडक्या बाप्पाला जड अंत:करणाने निरोप दिला.

येथील बाजारपेठेतील सार्वजनिक गणेशोत्सव , नवरात्र उत्सव मंडळ तर्फे दरवर्षी अकरा दिवसांच्या गणपतीचे पूजन केले जाते. यंदाही या पिंपळेश्वर गणपतीचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले होते. मंडळामार्फत गणरायाच्या चरणी आरत्या, अथर्वशीर्ष पठण , घुमट आरती, भजने आदींचे आयोजन करण्यात आले होते. गुरवारी दहाव्या दिवशी आयोजित सत्यनारायण महापूजा तसेच महाप्रसाराला गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. सावंतवाडीचे संस्थान चे युवराज लखमाराजे भोसले, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादीच्या कोकण प्रांत अध्यक्षा अर्चना घारे यांनी गुरवारी तर तत्पूर्वी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी आमदार राजन गेली यांनीही या बाप्पांचं दर्शन घेतलं. शुक्रवारी सायंकाळी या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. संपूर्ण दिवसभर सुरू असलेल्या संततधार पावसाचे सावट विसर्जन मिरवणुकीवर असतांनाही मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनीही विसर्जनाची जय्यत तयारी केली. मोठ्या उत्साह आणि तितक्याच भावपूर्ण वातावरणात रात्री उशिरा या गणपतीचे विसर्जन करण्यात आले.