अनंत चतुर्दशीला गणरायाला निरोप..!

Edited by: विनायक गावस
Published on: September 28, 2023 18:48 PM
views 110  views

सावंतवाडी : अनंत चतुर्दशीला शहरातील सार्वजनिक गणपतींसह घरगुती गणरायांना निरोप देण्यात आला. पुढच्या वर्षी लवकर या असं साकडं घालत मोठ्या जल्लोषात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला.

ऐतिहासिक मोती तलावात घरगुती गणरायांच विसर्जन करण्यात आले. सायंकाळपासून विसर्जनास प्रारंभ झाला. तर चितारआळी व सावंतवाडी नगरपरिषदेच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणूकीस सायंकाळी प्रारंभ झाला. शहरातून या मिरवणुका निघणार असून यावेळी साकारलेले भव्य देखावा खास आकर्षण ठरत आहेत. ढोल ताशांच्या गजरात या मिरवणुकांना सुरुवात झाली असून रात्री उशिरा विसर्जन होणार आहे. यानिमित्त नगरपरिषद प्रशासनासह पोलिस प्रशासनानं कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.