फरा प्रतिष्ठानचा आरोग्य विभागाने केला सन्मान

Edited by: संदीप देसाई
Published on: September 13, 2023 20:30 PM
views 133  views

दोडामार्ग : सामाजिक कार्यरत असलेल्या केर गावच्या फ. रा प्रतिष्ठानला भारत सरकारच्या आरोग्य खात्याकडून गौरविण्यात आले आहे. बुधवारी आरोग्य विभागाने येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजित केलेल्या आयुष्यमान भारत  कार्यक्रम प्रसंगी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या हस्ते व तहसिलदार संकेत यमगर, उद्योजक विवेकानंद नाईक, तालुका वैद्यकीय अधिकारी रमेश करतसकर यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते या प्रतिष्ठान ला सन्मानित करण्यात आल. 

   फरा प्रतिष्ठान प्रेमानंद देसाई यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. निक्षय मित्र योजने अंतर्गत क्षयरोगाने ग्रस्त रूग्णांना दत्तक घेण्याची सोय असते, स्वयंसेवी संस्था, संघटना, राजकीय पक्ष, अशा रूग्ण व्यक्तीना तसेच टिबी रुग्णाला दत्तक घेऊन त्याला उपचारासाठी मदत करू शकतो. दोडामार्ग तालुक्यातील सुमारे ३२ रुग्णांपैकी ६ रुग्ण फरा प्रतिष्ठानने साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रां अंतर्गत दत्तक घेतले होते.  सहा महिन्यांच्या कालावधीत त्यांना औषध उपचारास मदत करून पूर्णतः रोग मुक्त होण्यास सहकार्य केलं आहे. यासाठीच "फरा प्ररिष्ठान" यांचा आरोग्य विभागाने सन्मान केला. सर्वेश देसाई यांनी हे सन्मानपत्र स्वीकारले.