
सावंतवाडी : शहरातील प्रसिद्ध व्यापारी आत्माराम उर्फ आबा गोविंद बांदेकर (वय ६४) यांचे आज दुपारी दुःखद निधन झाले. उभाबाजार येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
संत गाडगेबाबा बाजारपेठ समोर त्यांचे भुशारी दुकान होते. शहरातील ते प्रसिद्ध व्यापारी होते. सामाजिक, राजकीय क्षेत्रात त्यांचे वेगळं वलय होत.गेले काही दिवस ते आजारी होते. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुना असा मोठा परिवार आहे. आज रात्री १० वाजता येथील उपरलकर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.