कणकवलीत शिवसेनेतील खोटे पक्षप्रवेश ?

वैदेही गुडेकरांचा आरोप
Edited by: उमेश बुचडे
Published on: November 27, 2023 12:23 PM
views 469  views

कणकवली : शिंदे गटाचे काही पदाधिकाऱ्यांना  उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रवेशासाठी कार्यकर्ते मिळत नसल्यामुळे काही गरीब महिलांना कर्ज प्रकरणाची आमिष दाखवून त्यांना प्रवेश करण्यास भाग पाडत असल्याची माहिती आमच्या जवळ आहे. खरे तर प्रवेश केलेल्या महिलांचा शिवसेनेची काडीमात्र संबंध नसून ते शिवसेनेचे यापूर्वी प्राथमिक सदस्य पण नव्हते, असा आरोप महिला तालुकाप्रमुख वैदेही गुडेकर यांनी केलाय. 

यापूर्वीच्या शिवसेनेच्या कुठच्याही कार्यक्रमात अथवा सभेत त्यांचा सहभाग नव्हता असे असताना केवळ रत्नागिरीतील वरिष्ठांना काहीतरी काम करत असल्याचे दाखविण्यासाठी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला बदनाम करण्यासाठी कणकवलीतील काही शिंदे गटाचे पदाधिकारी केविलवाणा प्रयत्न करत आहे.

लवकरच सर्वोच्च न्यायालय त्यांना त्यांची जागा दाखवून देणार असल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. तरी यापुढे असे खोटे पक्षप्रवेश करून मूळ शिवसेनेची बदनामी केल्यास त्याची भांडाफोड आम्ही केल्याशिवाय राहणार नाही याची त्यांनी नोंद घ्यावी, अशी मागणी महिला तालुकाप्रमुख वैदेही गुडेकर,  महिला उपशहर दिव्या साळगावकर  यांनी दिली.