
दोडामार्ग : नारायण राणे यांनी तिलारी धरणाच्या बुडीत क्षेत्रात पाचशे कारखाने आणायचे आहेत, तर त्याच डोंगरात दीपक केसरकर हत्ती अभयारण्य उभारणार आहेत. एकाच व्यासपीठावरून दोडामार्ग येथील सभेत त्यांनी यां घोषणा केल्या, याचा अर्थ स्पष्ट आहे कि रोजगाराचा प्रश्न गंभीर असताना हॆ दोन्ही नेते जनतेची चेष्टा करत आहेत, अशी टीका महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी टीका केली.
दीपक केसरकरांच्या प्रचारार्थ नारायण राणेनी दोडामार्ग येथे सभा घेतली. यां सभेतील भाषणावर श्री. तेली यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले की, पंधरा वर्षात शेकडो आश्वासन देवून काम न करणाऱ्या केसरकारांना निवडून देण्यासाठी नारायण राणे झटत आहेत. खरं तर एकमेकांची उणीधुणी काढून आता पुन्हा सत्तेसाठी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरणारे राणे - केसरकर हाच चेष्टेचा विषय बनला आहे. स्वतः केंद्रात मंत्री असलेल्या राणेना आडाळीत एक कोटीचा एक कारखाना आणता आला नाही. आणि आता तिलारी धरणाच्या आतील डोंगरात पाचशे कारखाने आणण्याच्या घोषणा करत आहेत. लोकसभा निवडणुकीत देखील याचं घोषणा केल्या. केंद्रात उद्योगमंत्री असताना एक उद्योग जिल्ह्यात आणता आला नाही. कारण येथील जनतेच्या रोजगाराच्या प्रश्नाच सोयरसुतक नाही. गेल्या पंधरा वर्षात काथ्या उद्योगापासून सुरु झालेला केसरकरांच्या खोट्या आश्वासनाचा प्रवास आता फार्मा उद्योगापर्यंत पोहचला आहे.
दोडामार्गच्या सभेत राणे हॆ तिलारी धरणाच्या आतील बाजूला असलेल्या डोंगरात पाचशे कारखाने आणायच्या गोष्टी सांगतात, तर त्याच सभेत केसरकर धरणच्या आतील क्षेत्रात हत्ती अभयारण्य करण्याचे आश्वासन देतात. याचा अर्थ दोघांनाही काहीच काम करायचे नाही. मतांसाठी त्यांनी जनतेची चेष्टा चालवली आहे. जनतेने दोघांनाही त्यांची जागा दाखवून दद्यावी . काम करता येत नसेल तर निदान जनतेच्या प्रश्नांची चेष्टा तरी करु नका. जनतेने आता स्वाभिमान दाखवून खोटारड्या केसरकारांना घरी बसवावे, अशी सडकून टीका केली आहे.