आदर्श ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करून गावाचा विकास साधा : जयप्रकाश परब

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 20, 2023 11:23 AM
views 99  views

देवगड : राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत पंचायत समिती देवगड आयोजित स्वामी समर्थ सभागृहात ‘ आमचा गाव आमचा विकास “उपक्रमांअतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करणेबाबतचे प्रशिक्षणाचे  देवगडज गटविकास अधिकारी यप्रकाश परब यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाले.

यावेळी मार्गदर्शन करताना गटविकास अधिकारी जयप्रकाश परब म्हणाले की, ग्रामपंचायत विकास आराखडा आदर्श करून गावाचा विकास साधा. तो आराखडा बनवताना ते गाव माझेच आहे. असे समजुन जर आराखडा तयार केल्यास त्यामध्ये त्रुटी राहणार नसल्याच मत त्यांनी मांडले . आराखड्यात पाणी, स्वच्छता आणि आरोग्य या बाबी अतिमहत्वाच्या असुन त्या दृष्टीने सुक्ष्म नियोजन करून कामे घ्या व गावाचा शाश्वत विकास साधा असे आवाहन ही त्यांनी केले.

गावपातळीवर विकास आराखडे करण्यासाठी हे महत्त्वाच प्रशिक्षण असुन चांगल्या ठिकाणी तसेच चर्चा व संवाद प्रशिक्षणातुन एकमेकांचे मुद्दे तसेच अनुभव शेअर केल्याने महत्वाच्या बाबींवर अभ्यास करून आराखडयामध्ये वैविधता आणणे शक्य होत असल्याच मत त्यांनी मांडल. यावेळी व्यासपीठावर सहाय्यक गटविकास अधिकारी निलेश जगताप, पशुधन अधिकारी विवेक ढेकणे, गिर्ये सरपंच लता गिरकर, नारींग्रे सरपंच महेश राणे, विस्तार अधिकारी अंकुश जंगले, मास्टर ट्रेनर गणेश जेठे, मास्टर ट्रेनर हर्षदा वाळके, वरीष्ट सहाय्यक श्रीम .स्वप्नजा बिर्जे, ग्रामविकास अधिकारी . रामदास हडपिडकर, वरीष्ट सहाय्यक उमेश ठाकुर , ग्रामसेविका श्रीम .संगिता राणे आदी मान्यवर उपस्थित होते . या प्रशिक्षणामध्ये प्रभारी अधिकारी पर्यवेक्षक, सरपंच , केंद्रप्रमुख , ग्रामविकास अधिकारी , ग्रामसेवक , आरोग्य कर्मचारी , बचतगट प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मधुसुदन घोडे आभार विस्तार अधिकारी अंकुश जंगले यांनी मानले.