रोहयात १८१ जणांची नेत्र तपासणी, ७३ मोतीबिंदू रुग्णांच्या शस्त्रक्रिया!

सिटीझन फोरम ट्रस्टचे सहकार्य
Edited by: रुपेश पाटील
Published on: January 04, 2023 19:19 PM
views 152  views

शशिकांत मोरे

रोहा : येथील नेत्ररुग्ण तपासणी शिबिरात बुधवारी १८१ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७३ रुग्णांना आजच आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. गेल्या ७ महिन्यांत रोहा सिटीझन फोरम ट्रस्टच्या माध्यमातून तब्बल ४७८ नेत्ररुग्णांंना नवी दृष्टी मिळाली आहे.

 रोहा सिटीझन फोरम ट्रस्ट आणि आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांच्या मंदीर सभागृहात झालेल्या या शिबिरात अल्पदरात चष्मे वाटप, मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. हॉस्पिटलचे टीम मॅनेजर प्रकाश पाटील, डॉ. सिमरन दीप कौर, प्रतिमा गावित, सोनाली पंदेरे, समृद्धी साळवी, दीपा परिहार, शुभम शिंदे, कल्पेश सावंत आदींनी रुग्णांची तपासणी केली.

 रोहा सिटीझन फोरम ट्रस्टचे अध्यक्ष नितीन परब, प्रदीप देशमुख, मिलिंद अष्टिवकर, दिलीप वडके, श्रीकांत ओक, अहमदशेठ दर्जी, उस्मानभाई रोहेकर, संतोष खटावकर, महेश सरदार, संदीप सरफळे, इल्यास डबीर, दिनेश जाधव, शैलेश रावकर, सचिन शेडगे, परशुराम चव्हाण, अमोल देशमुख, प्रशांत देशमुख, निलेश शिर्के, सिद्देश ममाले, दिनेश मोहिते, समिधा अष्टिवकर, भावेश अग्रवाल, बिलाल मोर्बेकर आदी फोरमच्या सर्व सदस्यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. रोहा नितिन परब यांनी सहयोगी संस्थांचे आणि शिबिरासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानले.