
मालवण : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नौसेना दिनाच्या निमित्ताने आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहे. त्यांचे आपण स्वागत करतोय. नौदलाला पण मी खूप खूप धन्यवाद देतोय की त्यांनी अशा पद्धतीने आजच्या नौदल दिनासाठी कोकणातील मालवण तालुक्यातील तारकर्ली येथील ठिकाणाची निवड केली. पण त्यांच्या दौराच्या निमित्ताने जी पैशाची उधळपट्टी चालली आहे. तीन हेलिपॅड उभारण्यात आली आहेत. यातील एक एक हेलिपॅड ९२ लाखाचे, ७८ लाखाचे आहेत. याची चौकशी करण्याची मागणी आपण पंतप्रधानांची भेट घेवून मागणी करणार असल्याची माहीती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. खासदार विनायक राऊत हे मालवण तारकर्ली येथील नौदल दिनाच्या निमित्ताने तारकर्ली येथे आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.