
सावंतवाडी : कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणी करण्यासाठी मुदत वाढवण्यात आली आहेत. उद्या १२ मे पर्यंत ही मुदत वाढवण्यात आली आहे. १२ मे ला संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत तहसीलदार कार्यालय चालू असेपर्यंत पदवीधर मतदार हे आपली नोंदणी करू शकणार आहेत यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तहसीलदार कार्यालयात विशेष कक्ष चालू ठेवण्यात आला आहे. आज शनिवार आणी उद्या रविवारी सुट्टी असली तरी ही कार्यालये सुरू राहणार आहेत. यासाठी उमेदवाराने पदवीचे सर्टिफिकेट, ओळख आणि रहिवाशी असल्याचा कागदपत्र यासह फॉर्म भरून सादर करायचे आहे.ऑनलाईन पद्धतीने ही नोंदणी होणार आहे. आचारसंहिता लागल्यानंतर पहिल्यांदाच एवढी मुदत वाढवण्यात आली आहे.याबाबत नाव नोंदणी करावी असे आवाहन सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले आहे.