खर्च निरीक्षक अंकुर गोयल यांची खर्च सनियंत्रण कक्षाला भेट

Edited by:
Published on: May 05, 2024 13:46 PM
views 44  views

सिंधुदुर्गनगरी : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता कार्यान्वित करण्यात आलेल्या खर्च सनियंत्रण कक्षास ४६ रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी नियुक्त खर्च विभागाचे निवडणूक निरीक्षक अंकुर गोयल यांनी भेट देऊन पाहणी केली आणि समितीच्या कामाजाची माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे, सहायक जिल्हाधिकारी विशाल खत्री, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, खर्च सनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी शिवप्रसाद खोत, अमित मेश्राम, निवडणूक निरीक्षकांचे संपर्क अधिकारी महेंद्र किणी आदी उपस्थित होते.

यावेळी  खर्च नियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी शिवप्रसाद खोत यांनी खर्च सनियंत्रण कक्षाच्या  कामकाजाची  सविस्तर माहिती दिली.  जिल्हा खर्च सनियंत्रण समिती मार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या विधानसभा मतदार संघातील उमेदवारांचे खर्चाचे लेखे एकत्रित करुन जिल्हा खर्च सनियंत्रण समिती रत्नागिरी कक्षास पाठविले जाते असेही श्री खोत यांनी यावेळी सांगितले. खर्च सनियंत्रण कक्षाचे कामकाज जाणून घेतल्यानंतर निवडणूक निरीक्षक अंकुर गोयल यांनी समितीमार्फत करण्यात येत असलेल्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले.