
सावंतावडी : मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव तालुका सावंतवाडी या ठिकाणी रानभाज्या प्रदर्शन व विक्री हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थचे सदस्य केळुसकर हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव या प्रशालेच्या शिक्षिका सौ. प्रज्ञा मातोंडकर यांच्या कल्पनेतून गेली ६-७ वर्ष हा कार्यक्रम घेण्यात येतो तसा यंदाही घेण्यात आला. या कार्यक्रमाला इयत्ता पाचवी ते सातवी मधील सर्व विद्यार्थ्यांनी रानभाज्याचे उत्कृष्ट मांडणी व माहिती सादर केली. यामध्ये रानात वाढणारे टाकळा, ओव्याची पाने, एक पानी, चुरणाची पाने, कारटोली, अळू बांबूचे कोंब अशा विविध भाज्यांचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली.
यासाठी प्रशालेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाबद्दल संस्था अध्यक्ष. शिवराम मळगावकर, संस्था सचिव श्री. आर.आर. राऊळ, खजिनदार श्री. नंदकिशोर राऊळ स्कूल कमिटी चेअरमन श्री. मनोहर राऊळ यांनी सर्वांचे विशेष अभिनंदन केले.