उबाठा सेनेची सोमवारी कार्यकारिणीची बैठक

Edited by:
Published on: March 02, 2025 12:17 PM
views 404  views

कुडाळ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कुडाळ तालुका कार्यकारिणीची बैठक सोमवार दि.०३ /०३ /२०२५ रोजी सकाळी ठिक ११ वाजता कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल क्र.२ येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी माजी आमदार वैभव नाईक,माजी आमदार परशुराम ( जीजी) उपरकर, माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतिश सावंत,उपनेत्या जान्हवी सावंत हे मार्गदर्शन करणार आहेत.  उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख संग्राम प्रभुगावकर, महिला जिल्हा आघाडी प्रमुख श्रेया परब, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 

तरी या बैठकीस कुडाळ तालुका कार्यकारिणीचे सर्व सदस्य, निमंत्रित सदस्य, शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे उपतालुकाप्रमुख, विभाग प्रमुख,विभाग संघटक,उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, बुथप्रमुख, माजी जि.प.सदस्य, माजी पं.स. सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं.सदस्य यांसह स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी -माजी लोकप्रतिनिधी,विविध सेलचे पदाधिकारी  व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, महीला आघाडी तालुका प्रमुख स्नेहा दळवी, मथुरा राऊळ, युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी यांनी केले आहे.