
कणकवली : कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड हे जोरात पाऊस झाल्याने रा.मा.178 देवगड निपाणी या रस्त्यावरील पावसात पाण्याचा निचरा कसा होतो हा पाहणी दौरा चालू असताना, हडपिड स्वामी समर्थ मठा कडील वळणावर मुसळधार पावसाने एका झाडाची फांदी तुटून रस्तावर पडली. हे कार्यकारी अभियंता यांच्या लक्षात येताच क्षणाचा ही विलंब न लावता गाडी थांबून फांदी बाजूला करून रस्ता अपघात होऊ नये म्हणुन तात्काळ बासुतकर, उप विभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंता
नवपुते आणि कर्मचारी शैलेश कांबळे , अविनाश लाड वाहन चालक व रवींद्र गोरुले यांच्या मदतीने बाजूला केली.आज सुट्टीचा दिवस असतांनाही त्यांनी बजावलेल्या कर्तव्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. तसेच त्याची हटके काम करण्याची पद्धत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.