
कणकवली : सार्वजनिक बांधकाम विभागात गतिमान काम करणारे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले कणकवली कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांचा उद्या वाढदिवस आहे. साधा स्वभाव आणि सामाजिक बांधिलकी जपणारा अधिकारी अशी त्यांची ओळख आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासामध्ये हातभार लावण्यासाठी सर्वगोड यांनी मोलाची भूमिका निभावली आहे. मालवण मधील नौसेना दिनानिमित्त राजकोट किल्ला उभारण्यात आला. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असे पुतळा देखील उभारण्यात आला. त्यामुळे कोल्हापूर पुणे मुंबई सांगली सातारा गोवा बेळगाव यासारख्या राज्यातून मोठे पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत आणि त्यामुळे जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ झाली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृहे रस्ते पूल शासकीय मेडिकल कॉलेजचे भूमिपूजन , देवगड न्यायालयाचे भूपूजन या सारख्या कामांना त्यांनी गती दिली आणि त्यामुळे विकासाला गती मिळाली असं म्हणालं वावगं ठरणार नाही.