
कणकवली : निवडणुकीच्या बीएलओ (बूथ लेव्हल अधिकारी) या कामातून शिक्षकांना वगळावे, अशी मागणी तहसलीदार दीक्षांत देशपांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.याबाबत बीएलओ कामकाजाबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून या कामबाबत योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन श्री. देशपांडे यांनी दिले.
निवेदनात म्हटले आहे की, निवडणुकीच्या बीएलओ सारख्या अशैक्षणिक कामकाजामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे बीएलओचे काम शिक्षकांना देण्यात येऊ नये. बीएलओच्या कामाचा देण्यात आलेला आदेश रद्द करण्यात यावा शिक्षकांना बीएलओ नेमणुकीची आॅर्डर प्राप्त झाली आहे. त्यांच्या काही वैयक्तिक अडचणी आहेत. महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्य व जिल्हा शाखा यांच्यावतीने देखील बीएलओचा आदेश रद्द होण्यासंदर्भात राज्यस्तरावरून प्रयत्न चालू आहेत.
निवेदनदेतेवेळी शिक्षक नेते टोनी म्हापसेकर, तालुकाध्यक्ष सुशांत मर्गज, सरचिटणीस निलेश ठाकूर, महिला आघाडीच्या नेत्या नेहा मोरे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष दर्शना हुंबे, सरचिटणीस सारिका पवार, कोषाध्यक्ष संतोष कांबळे, सचिन सावंत, कार्याध्यक्ष संतोष कुडाळकर, सल्लागार शिवाजी मडव, संजय तांबे, संदीप गोसावी, संचालक श्रीकृष्ण कांबळी, जिल्हा संघटक ईश्वरलाल कदम, तालुका उपाध्यक्ष जगन्नाथ घाडीगावकर, तळेरे विभागीय अध्यक्ष अजय सावंत, कणकवली विभागीय अध्यक्ष राजेंद्र कडुलकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा निकिता ठाकूर, महिला आघाडीच्या तालुका संपर्कप्रमुख रश्मी आंगणे यांच्यासह शिक्षक समिती जिल्हा व तालुका, पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.