गणेश चतुर्थी कालावधीत कणकवली पोलिसांचे उत्कृष्ट नियोजन...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: September 30, 2023 15:01 PM
views 232  views

कणकवली : तालुक्यात गणेश चतुर्थी  सणानिमित्त तसेच विविध कार्यक्रमानिमित्त पोलीस प्रशासनाने उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल आम्ही कणकवलीकर यांच्या वतीने पोलीस निरीक्षक अमित यादव यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी ज्येष्ठ नागरिक दादा कुडतरकर अशोक करंबेळकर, सामाजिक कार्यकर्ते संजय मालकर, राजेंद्र पेडणेकर प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मनोहर पालियेकर उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुका हा अतिसंवेदनशील मानला जातो आणि याच तालुक्यांमध्ये सर्वच मोठ्या घडामोडी होत असतात. मग त्या राजकीय असेल सांस्कृतिक असतील किंवा सामाजिक असतील याच पार्श्वभूमीवर कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव  यांनी तालुक्यात गणेश चतुर्थी निमित्त मोठ्या संख्येने गर्दी होते त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने मुंबईवरून येणाऱ्या गाड्यांचे पार्किंग तसेच सर्विस रस्त्यावरील वाहनांना होणारा अडथळा या संदर्भात चांगले नियोजन केले तसेच गणरायाच्या आगमनावेळी होणाऱ्या स्वागताच्या मिरवणुका तसेच विसर्जना वेळी होणारी गर्दी पाहता चांगला बंदोबस्त ठेवून  गणेश चतुर्थी कालावधीत उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल आम्ही कणकवलीकरांच्या वतीने कणकवली पोलीस निरीक्षक यादव व पोलीस प्रशासनाचा सत्कार करण्यात आला.