डोंगर जमिनीत खोदकामामुळे घरे - शेतीस धोका : सदानंद सांगळे

Edited by: विनायक गावस
Published on: July 31, 2023 14:06 PM
views 265  views

सावंतवाडी : माडखोल येथे डोंगर जमिनीत खोदकाम केल्यामुळे घरास व शेतीस धोका निर्माण झाल्याची तक्रार सदानंद सिताराम सांगळे यांनी सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे केली आहे.  माडखोल गावातील रेवकोंडवाडी येथे राहते घर व शेतजमीन आहे. मिळकतीचा विचार करता ही मिळकत डोंगर पायथ्याशी आहे. या मिळकतीत डोंगर खोदाई खाजगीरित्या करण्यात आल्याने आमच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. जमीन मालक यांनी खाजगिरित्या डोंगरामध्ये खोदाई केल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही, पाण्याच्या प्रवाहामुळे माझ्या शेतमिनी व पिण्याच्या पाण्याचे विहिरीत खोदाई केलीली माती भरली आहे.

तसेच डोंगर अतिरेकी पध्दतीने खोदाई केल्यामुळे माझ्या राहत्या घरास व कुटुंबास धोका निर्माण झाला आहे. जमीनीमालकाच्या निदर्शनास ही बाब मार्च 2023 रोजी आणली होती. परंतु, मालकाने उध्दट उत्तरे देवून अरेरावीची भाषा केली आहे. मी सर्वसामान्य शेतकरी असून मला न्याय मिळावा, परिस्थितीवर ताबडतोब निर्णय व्हावा.  आठ दिवसात निर्णय न झाल्यास माझ्यासह सर्व कुटुंब ग्रामपंचायत माडखोल येथे दिनांक 01 ऑगस्ट 2023 रोजी पासून उपोषणास बसेल, प्रचंड प्रमाणात पाउस पडत असल्याने सदर डोंगर खवून उत्खलन होवून माझ्या कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण झाल्यस त्यास प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असा इशारा त्यांनी दिला आहे.