
वैभववाडी : सडुरे तांबळघाटी येथील महाविद्यालयीन विद्यार्थीनी सुप्रिया संतोष बोडेकर (वय-१८) ही काल ता. १८ सकाळी 9 वाजल्यापासुन बेपत्ता आहे. यासंदर्भात तिचे वडील संतोष बोडेकर यांनी पोलीसांत तक्रार दिली आहे.
सुप्रिया ही बारावीत शिकत आहे. काल सकाळी नऊ वाजता मैत्रिणीसोबत वैभववाडीला जाते असे सांगुन घरातुन निघुन गेली. त्यानंतर सायकांळी उशिरापर्यत ती घरी परतली नाही. त्यामुळे नातेवाईकांनी तिची शोधाशोध केली. परंतु ती कुठेही आढळुन आलेली नाही. त्यामुळे आज सकाळी वडील श्री.बोडेकर यांनी पोलीसांत तक्रार दिली. सुप्रिया हिची दोन दिवसांनी परीक्षा आहे.