
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हयातील प्रत्येक मतदान केंद्रावर तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे मोबाईल व्हॅनव्दारे ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन्सचा वापर व कार्य याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ कणकवली येथे प्रांताधिकारी जगदीश कातकर व तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
जनजागृती मोहिमेत ईव्हीएम – व्हीव्हीपॅट मशीन्सबाबत मतदारांना संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे. माहिती देण्यासाठी कर्मचारी वर्ग देखील नियुक्त करण्यात आले आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन्सचा वापर व कार्य याबाबत जनजागृती मोहिम २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅनव्दारे राबविण्यात येणार आहे. जनजागृती मोहिमेत मोठया प्रमाणात सहभाग नोंदवावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.यावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दिक्षांत देशपांडे, गौरी कट्टे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.