जिल्हा प्रशासनाचे प्रत्येक कार्यालय लोकाभिमुख पाहिजे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या महसुलच्या आढावा बैठकीत सूचना
Edited by:
Published on: January 25, 2025 19:12 PM
views 232  views

सिंधुदुर्ग : सरकारची प्रतिमा तुमच्या महसूल खात्यामुळेच वाढते.त्यामुळे अधिकाऱ्यांनी शभर टक्के सहभाग द्या. एकही काम पेंडिंग राहता नये. याची काळजी द्या. जनतेला तालुक्यात आणि जिल्हात दाखले,आणि प्रलंबित कामांसाठी फेऱ्या माराव्या लागता नये. मला प्रशासन फक्त चालवायचे नाही तर पळवयाचे आहे. कामाच्या वेळेला शंभर टक्के काम द्या. जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक महसूल स्थरावर झाली पाहिजे. भविष्यात नवनवीन उद्योग येणार आहेत.अधिकारी म्हणून  तुमचे योगदान महत्वाचे आहे.आम्ही लोकप्रतिनिधी येथील जनतेच्या सेवेसाठी आहेत.१०० टक्के येथील जनतेसाठी आम्ही वाहून घेतले आहे. त्यामुळे जनतेचा विकास झाला पाहिजे. लोकाभिमुख कार्यालय म्हणजे तहसील आणि महसूल चे कार्यालय असे नावारूपास आले पाहिजे असे काम करा.अशा सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या. या बैठकीला जिल्हाधिकारी अनिल पाटील, सर्व उपविभागीय अधिकारी व सर्व तहसीलदार सर्व महसूल खातेप्रमुख उपस्थित होते.

मंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना देताना सांगितले की,शासनाला द्यावयाच्या महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करा,महसूल प्रशासनाला पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचना देतानाच वाळू प्रकरणी जिल्हा दिवसेंदिवस बदनाम होत  आहेत.असे प्रकार चालणार नाहीत.योग्य पद्धतीने काम करा.सिंधुदुर्ग जिल्ह्यात पैशाची उलाढाल होते,अनेक व्यवसाय  चालत आहेत मग महसूल जमा करण्या मध्ये प्रशासना कडून दिरंगायी का होते. शासनाला द्यावयाचा महसूल मार्च महिन्याच्या अखेरीस जमा करताना प्रत्येक तालुक्याने टार्गेट पूर्ण झाले पाहिजे.त्या दृष्टीने महसूल प्रशासनाने काम करावे अशा सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या.