मुख्यमंत्र्यांआधीच भाजपनं फोडले विकासाचे 'नारळ'..!

Edited by: विनायक गावस
Published on: February 10, 2024 09:09 AM
views 425  views

सावंतवाडी : माजगाव धरणानंतर सावंतवाडी येथील नळपाणी योजनेच भुमिपूजन माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन भुमिपूजन होणार असताना भाजपने त्या आधीच प्रकल्पस्थळी जात नारळ फोडले आहेत‌.

पाळणेकोडं धरण येथील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महा अभियान अंतर्गत सावंतवाडी शहर पाणीपुरवठा नळपाणी योजनेचे भूमिपूजन भाजपचे माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब,माजी नगरसेवक मनोज नाईक, सुधीर आडिवरेकर,आनंद नेवगी,दिपाली भालेकर, समृध्दी विरनोडकर,भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंधवळे,महिला शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर,भाजप ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भालेकर,शहर सरचिटणीस विनोद सावंत,परिक्षीत मांजरेकर,महिला सरचिटणीस मेघना साळगावकर,सुकन्या टोपले,साक्षी गवस,चराठा उपसरपंच अमित परब,युवा मोर्चा चिटणीस बंटी पुरोहित  रोणापाल उपसरपंच उदय देऊलकर आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी देखील या नळपाणी योजनेसाठी पाठपुरावा केला होता. माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कारकिर्दीत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून संजू परब यांनी  ही नळपाणी योजना मंजूर करून आणली होती‌. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते त्याच भुमिपूजन होणार होत‌. एकीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या दोन्ही प्रकल्पांच भुमिपूजन होणार असताना त्या आधीच भाजपनं नारळ फोडल्यान 'श्रेयवादा'ची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.