सकाळी 10 नंतरही किरणपाणी पुलावर पथदिवे चालूच !

नागरिकांमध्ये बनला चर्चेचा विषय
Edited by: संदेश नाईक
Published on: February 20, 2023 12:08 PM
views 250  views

आरोंदा : आरोंदा - किरणपाणी चेक पोस्टजवळील पथदीप सकाळचे दहा वाजून गेले तरी अजुनही तसेच आहेत. हे दिवे नक्की बंद करणार तरी कधी, असा सवाल काही नागरीकांमधून करण्यात येत आहे . सकाळी दिवे लवकर बंद करण्याची आवश्यकता आहे. परंतु आरोंदा किरणपाणी चेकपोस्ट जवळील पथदीप अजूनही पेटतत आहेत. नागरिकांमध्ये हा चर्चेचा विषय बनला आहे.