
बांदा : युरोप खंडातील बल्गेरिया या देशातून भारतीय अभ्यास दौऱ्यासाठी आलेल्या आठ रशियन पर्यटकांनी बांदा येथील पीएम श्री जिल्हा परिषद केंद्र शाळेला भेट देऊन विद्यार्थी व शिक्षकांनी हितगुज साधली. जवळपास तासभर या पर्यटकांची बांदा केंद शाळेत विद्यार्थ्यांना सोबत उपस्थित राहत शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनाही परदेशी पाहुण्यांचे शाळेत आगमन झाल्याबद्दल अत्यांनंद झाला. या मान्यवरांचे मुख्याध्यापक शांताराम असनकर व शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी पर्यटकांनी विद्यार्थ्यांनी परिधान केलेल्या स्काऊट गाईड गणवेशाचे कौतुक केले.वर्गात जाऊन फळ्यावर LEARN HARD,BE CLEAR असे लिहत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.