वैभववाडी बसस्थानकात ई टॉयलेटचे लोकार्पण

Edited by:
Published on: May 02, 2025 16:51 PM
views 403  views

वैभववाडी : वाभवे - वैभववाडी नगरपंचायतीच्यावतीने एसटी बसस्थानकात उभारण्यात आलेल्या ई टॉयलेटचे आज (ता.२) नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे यांच्या हस्ते  लोकार्पण झाले.हे शौचालय केवळ महीलांसाठी असणार आहे.

बसस्थानकात सुलभ शौचालय नसल्याने महीला प्रवाशांची गैरसोय होत होती.ही बाब लक्षात घेऊन नगरपंचायतीच्यावीने बसस्थानक परिसरात १६लाख रुपये खर्चून ई टॉयलेट उभारण्यात आले.त्याच आज लोकार्पण झाले.या शौचालयाचा वापर केवळ महीलांसाठी करता येणार आहे.

या लोकार्पण सोहळ्याच्यावेळी उपनगराध्यक्ष प्रदीप रावराणे, माजी नगराध्यक्षा नेहा माईणकर,भाजपा महिला तालुकाध्यक्ष प्राची तावडे, बांधकाम सभापती रणजित तावडे,विवेक रावराणे, वाहतूक नियंत्रक बाबुराव गुरखे,शहर अध्यक्ष शिवाजी रावराणे,,युवा शहर अध्यक्ष आशिष रावराणे,मंदार रावराणे आदी उपस्थित होते.