माड्याचीवाडी स्वामी समर्थ मठ इथं योगशिक्षक प्रशिक्षण केंद्राची स्थापना

Edited by: विनायक गावस
Published on: August 13, 2023 13:12 PM
views 325  views

सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी परिसरातील श्री स्वामी समर्थ मठ येथे योगशिक्षक प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास अभ्यासवर्ग या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाशी संलग्नित अभ्यास केंद्राचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे सावंत - भोंसले, प. पू. गावडे काका महाराज, आर्किटेक्ट अमित कामत, विजय चव्हाण यांच्यासह विविध पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.