
दोडामार्ग : सिंधुदुर्ग सांस्कृतिक लोककला मंच दोडामार्ग या मंचाची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी शंकर मधुकर जाधव, उपाध्यक्षपदी महादेव तुकाराम सुतार, सौं. विनिता विलास देसाई तर सचिवपदी सागर लक्ष्मण नाईक यांची निवड करण्यात आली आहे. या मंचाच्या माध्यमातून दोडामार्ग तालुक्यात प्रथमच शनिवार दिनांक ६ व रविवार दिनांक ७ जानेवारी २०२४ या कालावधीत "लोककला महोत्सवाचे" आयोजन करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त दोडामार्ग तालुक्यातील कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी या महोत्सवात दिली जाणार आहे.
सिंधुदुर्ग सांस्कृतिक लोककला मंच दोडामार्ग कार्यकारिणी पुढील प्रमाणे अध्यक्ष :- शंकर मधुकर जाधव (घोटगे), उपाध्यक्ष :- महादेव तुकाराम सुतार (साटेली), सौं. विनिता विलास देसाई (कोनाळकट्टा), सचिव :- सागर लक्ष्मण नाईक (झरेबांबर), सहसचिव :- विलास श्रीधर आयीर (साटेली),खजिनदार :- महेश अर्जुन पारधी (बोडदे), सहखजीनदार :- संदीप आनंद जाधव (झरेबांबर), सल्लागार :- प्रकाश लक्ष्मण वर्णेकर (खोक्रल), संजय तुकाराम सुतार (उसप), कार्याध्यक्ष :- संजय शंकर गवस (शिरंगे पुनर्वसन), प्रचार आणि प्रसिद्धी :- प्रमुख देविदास गणू सुतार (पिकुळे), सदस्य :- शांताराम प्रभाकर बेनकर (मणेरी), अशोक गंगाराम गवस (मांगेली कुसगेवाडी), कल्पेश गणेश करमळकर (मणेरी), साक्षी संदीप नाईक (बोडदे), मनीषा विष्णुदास नाईक (मणेरी) अशी आहे.
दोडामार्ग तालुक्यात प्रथमच होणाऱ्या "लोककला महोत्सवामध्ये" फुगडी, समई नृत्य, महिलांच भजन, व्हायोलीन वादन, चपई नृत्य, धालोत्सव, ओव्या, पुरुषांच दशावतारी नाटक, महिलांच दशावतारी नाटक, दिंडी, कीर्तन, मिमिक्री, घुमट वादन, राधा नृत्य, गोंधळ, कळसूत्री बाहुल्या, समूहगीत, स्वागत गीत, पुरुषांच भजन, सनई वादन, लावणी, कोळी नृत्य, बासरी वादन, रनमाला, वाघखेळ, तालगडी, मांड वादन, मुसळ वादन, कुणबी नृत्य अशा विविध कला सादर केल्या जाणार आहेत. या महोत्सवात प्रामुख्याने दोडामार्ग तालुक्यातील कलाकारांना संधी दिली जाणार आहे.
बदलत्या काळा नुसार लोप पावत असलेली कोकणातील लोककला या कलेची ज्या कलाकारांनी जोपासना करून जिवंत ठेवली, या कलेचं महत्व काय आहे. आपली संस्कृती कोणती याची आजच्या तरुण पिढीला माहित असावी म्हणूनच हे धाडशी पाऊल "सिंधुदुर्ग सांस्कृतिक लोककला मंच दोडामार्ग" यांनी उचलून या कलांचा प्रचार, प्रसार त्याच बरोबर या कलांच्या माध्यमातून समाज प्रबोधन कसे केले जाते. याच प्रत्यक्ष अनुभव आजच्या नवीन पिढीला अनुभवता आला पाहिजे आणि म्हणूनच आपली संस्कृती, आपली लोककला जिवंत ठेवणे आणि ही कला जोपासत असलेल्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर हा उपक्रम राबवीला जात आहे असे मंच्याचे अध्यक्ष शंकर जाधव यांनी माहिती देत या महोत्सवाला सर्वांनी तन, मन आणि धन या स्वरूपाने सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.