
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील शैक्षणिक व्यवस्तेचा आढावा घेत असताना शिक्षण विभागाची असतापनाच मंजूर नसल्याचे आज कोकणसाद टीमला निदर्शनास आले. गटशिक्षण विभागला आज पुन्हा भेट दिली असता हा परकार उघडकीस आला आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री असताना त्यांच्याच मतदार संघात शिक्षणाची ही अवस्ता असेल तर कस होणार? या प्रश्नाने पुन्हा एकदा डोक वर काढले आहे.
दोडामार्ग तालुका स्वतंत्र निर्मिती होऊन आज.... वर्षे झाली तालुका निर्मिती झाल्यापासुन गटशिक्षण विभागाला फक्त गटशिक्षण अधिकारी पद सोडले तर आस्थापनाच मंजूर नाही आहे. दोडामार्ग, सावंतवाडी येथील पंचायत समितीचे कर्मचायरी अधिकारी यांचि तात्पुरती दोडामार्ग शिक्षण विभाग येथे नियुक्ती केल्याचे आज स्पष्ट झाले आहे. या संदर्भात आज दोडामार्ग गटविकास अधिकारी सावंत यांची भेट घेऊन या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी पंचायत समितीचे कर्मचारी यांची त्या ठिकाणी तात्पुरती नेमणूक केली असल्याचे सांगितले आहे. शिक्षकांचे व इतर कर्मचाऱ्यांचे वेतन हे पंचायत समिती मार्फत काढले जात असल्याचे त्यांनी बोलताना स्पष्ट केले.
तात्काळ ताडपत्री घालण्याचे आदेश
दोडामार्ग तालुक्यातील नादुरुस्त शाळांची बातमी कोकणसादला प्रसिद्ध झाल्या नंतर आज बुधवारी शिक्षण विबगाच्या वरिष्ठ पातळी वरून नादुरुस्त शाळाचा आढावा घेतलाच पण ज्या शाळांचे छप्पर गळती लागलेली आहे त्या शाळाना तात्काळ ताडपत्री घालण्याचे आदेश आज देण्यात आल्याचे गटशिक्षण अधिकारी रुपाली तेलतुंबडे यांनी सांगितले आहे व लवकरात लवर सर्व शाळा मतदानाचा कालवधी संपल्या नंतर दुरुस्त करण्यात येतील असे त्यांनी सांगितले
शिक्षणमंत्र्यांनी आस्थापना मंजूर करून दाखवावी : बाबुराव धुरी
दरम्यान शिक्षण विभागाची आस्तापना मंजूर नसल्याचे उघडकीस आल्या नंतर उभाठा चे उपजिल्हा प्रमुख बाबूराव धुरी यांनी आपली प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की कोकणसाद रुत्तपत्राचे आपण सर्व प्रथम आभार मानतो व अभिनंतन करतो कारण शिक्षणाच्या विषयावर आपण लक्ष घालून शिक्षणाची बिकट अवस्ता सरकारच्या निदर्शनास आणून दिले. खर म्हणजे दोडामार्ग तालुक्याची निर्मिती होऊन 25 वर्षे झाली या पूर्वी बरेच आमदार खासदार होऊन गेले मात्र सध्याचे दोडमार्ग -सावंतवाडी मतदार संघाचे विध्यमान आमदार तथा राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या तालुक्यात प्रथमता शिक्षणा च्या दुरवस्थेवर लक्ष देण महत्वपूर्ण होत. दोडामार्ग तालुक्यात त्यांचं भरपूर प्रेम आहे म्हणून ते सांगतात तर त्यांचा मंत्री पदाचा कालवधी संपण्या आधी त्यांनी दोडामार्ग शिक्षण विभागाची आस्तापना मंजूर करून येथील मुलांना, शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा असे मत व्यक्त केले आहे.